मी पाहिलेले कश्मीर विहार हॉलिडेज सोबत...!
खूप दिवसापासून कश्मीर पाहायची इच्छा होती. खासकरून वयोवृद्ध सासू -सासऱ्यांची. टूर प्लॅन करीत असताना मनात
खूप काही प्रश्न होते. पहिला प्रश्न म्हणजे की काश्मीरला जाणे योग्य राहील का? कारण दर दिवशी कश्मीर बद्दल वेगवेगळ्या बातम्या कानावर पडत असतात. त्यातही माझ्या सोबत प्रवास करणारे एक नव्हे तर तब्बल पाच सिनिअर सिटीझन होते, शिवाय माझी पाच वर्षाची मुलगी.
                               
                               
 
                               याशिवाय ही बरेच प्रश्न मनात होते. तिथलं वातावरण त्यानां सूट होईल का? त्यांची व्यवस्था नीट होईल का? शिवाय असा कोण टूर ऑपरेटर असेल जो सगळं व्यवस्थित अरेंज करून देईल... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बजेटमध्ये.
                            
तेव्हा एका मित्राने मला विहार हॉलिडेजच्या संजय वझे यांचा नंबर दिला. त्यांच्याशी फोनवर बोलून आणि प्रत्यक्षात भेटून मला एक आत्मविश्वास निर्माण झाला. किंबहुना त्यांचं एकच वाक्य "तुम्ही सगळं आमच्यावर सोडा" मला टूर निश्चित करण्यासाठी पुरेसा होतं. 
                           पहिल्यांदा जेव्हा श्रीनगर मध्ये पाय ठेवला तेव्हा जाणवलं की खरंच या भूमी ला स्वर्ग का म्हणतात ते. डाल लेक वरची ती सुदर होउसबोट, तिथलं अप्रतिम जेवण, शिकारा राईड, मीनाबाजारमध्ये खरेदी आणि नयनरम्य दृश्य... मन पहिल्याच दिवशी भारावून गेलं होतं. शिवाय गुलमर्ग येतील गोंडोला राईड, पांढऱ्याशुभ्र बर्फावरची मस्ती आणि फोटो सेशन... आपण वेगळया दुनीयेत पाऊल ठेवलं आहे असं वारंवार वाटत होतं. पहेलगाम मधील ती बेताब व्हॅली, आरु व्हॅली, चंदनवाडी आणि
तेथील शुभ्र फेसाळलेली लेदर नदी हे सगळं पाहण्यात आम्ही हरवून गेलो होतो. दिवस कसा जात होता हे कळत नव्हतं.
                            
जीव मुठीत घेऊन सोनमार्ग येथून झीरो पॉईंट, कारगिल बॉर्डर पर्यत केलेला प्रवास ज्यामुळे "डर के आगे जीत है" हे ब्रीदवाक्य सत्य करून गेला. केवळ एकच वाहन व्यवस्थित जाऊ शकेल अश्या रोडवर आर्मीचे मोठे ट्रक आणि आमचे वाहन क्रॉस करून जात होते. बाजूला असणारी हजारो फूट खोल दरी पाहून आम्ही सगळेच आपले डोळे गच्च बंद करून घेत होतो.पण यात एक वेगळीच मज्जा होती.
या सगळ्या गोष्टींचा आम्ही अनुभव घेत होतो. आमच्या सोबत उत्तम ड्राइवर कम आमचा गाईड होता ज्याचं नाव होतं आरजू भाई. त्याने आम्हा सर्वांची आम्ही सगळे फॅमिली मेम्बर असल्यासारखी काळजी घेतली.
उत्तम हॉटेल्स, उत्तम जेवण आणि आमच्या परीने जी आमच्या साठी उत्तम असेल अशी त्यांनी बनवून दिलेला सहल कार्यक्रम यामुळे हा दूर आम्हा सगळ्यांच्या आयुष्यभर स्मरणात राहील.
वय ६८ - ७३ असणाऱ्या सासू सासऱ्यांना जेव्हा मी विचारलं की तुम्हाला टूर कशी वाटली, त्यांनी म्हटलं की आमचं आयुष्य
आता वाढलं आहे. 
या सर्व गोष्टीच श्रेय मी विहार हॉलिडेजची टीम - अक्षता, संदीप आणि संजय वझे याना देऊ इच्छितो. ज्यांनी इतका चांगली टूर प्लॅन करून दिली.
                            
 - अनुप बडोदेकर आणि फॅमिली, मुंबई  
                            ९७ ६८ ६३ ७२ २२
- 12 June 2019

 
                                
                                



